पुणे: वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी वडगाव शेरी येथे तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली. ( Vadgaon Sherit Police has arrested those vandalizing vehicles)
वडगाव शेरी येथील एका सोसायटीत टोळक्याने हत्यारांचा धाक दाखवीत तरुणाला मारहाण केली.तसेच सोसायटीतील चार फोर व्हीलर, दोन रिक्षा व दोन दुचाकी यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. चंदन नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे.
मंगळवारी रात्री वडगावशेरी,चंदन नगर परिसरात या तोडफोड करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धिंड काढली. दिवसेंदिवस गुन्हेगारी टोळक्यांकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा गुन्हेगारी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई सातत्याने करणार असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी यावेळी सांगितले.
माझा हात मुरगळला, माझं रक्त कोणी काढलं तर पोलिसांनी काढलं, दुर्दैव: मराठी माणसाच्या मागे उभे राहणारे मंत्री नाहीत, परंतु लोढासारखे मंत्री आहेत - गोवर्धन देशमुख ( My hand...
Read moreDetails