विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे आमदार सुरेश धस यांना वाटले हा मुद्दा उचलला की धनंजय मुंडेंसोबत तडजोड करता येईल. मिळून मिसळून लुटता येईल अशी त्यांची चाल होती असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे. ( Anjali Damania alleges that Suresh Dhas raised the issue that he thought a compromise could be made with Dhananjay Munde)
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. यावरून त्यांच्यावर टीकेचे मोहोळ ऊठले आहे. धस मांडवली करत असल्याचेही आरोप होत आहेत, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धस यांनीच मुंडेंवर पहिल्यांदा आरोप केले होते,
यावर दमानिया म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. मंत्री ठरवणार का राजीनामा द्यायचा की नाही?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाही. दरम्यान पोलिसांना कृष्णा आंधळेला शोधायचं असतं तर त्यांनी कुठूनही खोदून माहिती काढली असती असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. घरापर्यंत आलेली ऑर्डर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे परत गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेही काहीही करू शकतात, असे त्या म्हणाल्या.