Saif Ali Khan stabbed by thief
मुंबईतील वांद्रे परिसरात सैफ अली खानच्या घरी सुरक्षा असतानाही चोर घरात घुसला. रात्री अडीच वाजता चोरीच्या बहाण्याने आलेल्या चोरानं सैफवर चाकूनं वार केले.चाकूचा एक घाव त्याच्या मणक्याजवळ लागला आहे.
न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि एनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या मणक्यात आतापर्यंत किती घाव गेला त्याची माहिती समजू शकते असं डॉ. उत्तमानी यांनी सांगितलं.
सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्याच्यावर शस्रक्रिया करावी लागणार असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. चाहत्यांनाही ही बातमी कळल्यानंतर चाहते सैफ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
सैफवर वार करणाऱ्या चोराचं सैफच्या मोलकरणीसोबत भांडण झालं. सैफ तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर कोण होतं हे अद्याप समजू शकलं नाही? पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.