[5:28 pm, 7/1/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यामध्ये सलग अकराव्या वर्षी ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोलारीस लब, मयुर कॉलनी येथे दि. १७ ते २३ जानेवारी या कालावधीत होणार आहे. आपापल्या काळातील राष्ट्रीय विजेते आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षक असणारे दिग्गज् वरिष्ठ खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
तब्बल सव्वा-सहा लाख रूपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस लब आणि ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटना (जीएसटीए) आणि रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी (आरपीटीए) यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या भव्य स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लबच्यावतीने करण्यात आले असून स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडू सहभागी होणार आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती सांगताना सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली म्हणाले की, ज्या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय विजेतेपदके पटकावली असून आपल्या काळातील ते सर्वोत्तम खेळाडू होते, अशा अनेक वरिष्ठ आणि माजी खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. सलग दहाव्या वर्षी ही स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येत असून पुण्यामध्ये सोलारीस क्लबला या स्पर्धेचा आयोजनाचा मान सलग अकराव्यांदा मिळाला आहे. ही स्पर्धा ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील, ५५ वर्षावरील, ६५ वर्षावरील आणि ७० वर्षावरील अशा पाच गटात होणार आहे. ही स्पर्धा एकेरी आणि दुहेरीमध्ये होणार आहे. जीएसटीए या संघटनेच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन होत असून वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी पुण्यातील युवा खेळाडूंना मिळणार आहे.
माजी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अव्वल मानांकित पुरूष गटातील मानांकित खेळाडू व पुण्यातील नितीन किर्तने, तसेच प्रशिक्षक रविंद्र पांड्ये, केतन धुमाळ, मंदार वाकणकर, अजय कामत, अभिषेक ताम्हाणे, संदीप किर्तने, जयंत कढे, नीलकंठ डाबरे तसेच नाशिकचे श्रीकांत पारेख, गुजरातच्या अजय लखोटीया आणि मुंबईच्या किशोर सबनानी, नीरज आनंद, भुषण अकूट असे मानांकित खेळाडू स्पर्धेत झुंझणार आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी मुख्य रेफ्री रविंद्र पांड्ये (९८९०२१४३४३), गट संयोजक सुनैना श्रीवास्तवा (८३०८८३६६३६) किंवा क्लब समन्वयक राजेश सपकाळ (८३०८८३८०११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
[5:29 pm, 7/1/2025] Harshu:
न्यूझीलंडचा ऐतिहासिक विक्रम: एका टेस्ट डावात तीन फलंदाजांचे १५०+ धावा; ९५ वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी (New Zealand’s Historic Feat: Three Batters Score 150+ in a Single Test Innings...
Read moreDetails